Friday, August 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2026
in राष्ट्रीय
0
म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशात साखरेच्या दराने उच्चांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या E20 धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयामुळे ऊस आणि धान्याचा मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीसाठी वापर होत आहे. याचा परिणाम साखर आणि इतर अन्नधान्यांच्या किमतीवर होत असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी X वर पोस्ट करत E20 धोरणामुळे सामान्य नागरिकांना दुहेरी फटका बसत असल्याचे म्हटले आहे. एका बाजूला वाहनांच्या इंधन खर्चाचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे स्वयंपाकघरातील खर्च वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

साखरेच्या दरात मोठी वाढ

काँग्रेसच्या दाव्यानुसार, सुमारे २५ लाख टन ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे बाजारातील साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेचा दर ४८ रुपयांवरून थेट ६७ रुपये किलोपर्यंत वाढल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. गुळाच्या दरातही वाढ झाली असून, तो ५० रुपयांवरून ६५ रुपये किलोवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.यासोबतच तांदळाच्या किमतीत १६ टक्के, मक्याच्या पिठाच्या दरात ११ टक्के आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात १०.३४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे इथेनॉल धोरणाचा परिणाम केवळ पेट्रोलपुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.

‘पेट्रोल स्वस्त झाले कुठे?’

E20 मिश्रणामुळे पेट्रोलची किंमत कमी होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा फायदा का मिळत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असतानाही पेट्रोलच्या दरात मोठी कपात झालेली नाही, असे रमेश यांनी म्हटले आहे.

मायलेजवरही काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे काही वाहनांमध्ये मायलेज कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. वाहनांच्या इंधन प्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो का, तसेच सर्व वाहनांसाठी E20 कितपत अनुकूल आहे, याबाबत ग्राहकांच्या मनात प्रश्न असल्याचे पक्षाने म्हटले आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही E20 धोरणावर सातत्याने टीका केली जात आहे. कमी मायलेज, वाहनांची अनुकूलता आणि ग्राहकांसमोरील मर्यादित पर्याय या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे.

दरवाढ रोखण्यासाठी केंद्राचा साखर आयातीचा निर्णय

दरम्यान, साखरेच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने २० ऑगस्ट रोजी १० लाख मेट्रिक टन कच्ची साखर शून्य आयात शुल्कावर आणण्यास मंजुरी दिली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढण्याची आणि आगामी काळात दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे. मात्र, साखरेच्या दरवाढीचा संबंध E20 धोरणाशी जोडत काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांमुळे हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्याही चांगलाच तापला आहे. काँग्रेसने E20 धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली असून, ग्राहकांना इथेनॉलमिश्रित पेट्रोलशिवाय पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘महा वॉकेथॉन’ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जलसंधारणाची शपथ घेऊन जलसमृद्ध जिल्ह्याचा संकल्प

Next Post

कंबरेला गावठी कट्टा घेऊन फिरत होता तरुण; रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कंबरेला गावठी कट्टा घेऊन फिरत होता तरुण; रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कंबरेला गावठी कट्टा घेऊन फिरत होता तरुण; रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे १ कोटी ७५ लाख थकवले; पाचोऱ्यात तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

August 21, 2026
जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

August 21, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 4,029 जागांसाठी भरती सुरू, पात्रता काय?

August 21, 2026
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

August 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page