Thursday, August 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

‘१७ सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होणार’; संजय राऊतांच मोठं भाकीत, थेट मोदी आणि शाह यांचं नाव घेत..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2026
in राजकारण, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
आम्हाला जेलमध्ये टाकले, आता तुमचा नंबर.. ; जळगावच्या सभेत संजय राऊतांचा इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदींना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल, असा दावा करताना ‘१७ सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होईल’, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी आगामी एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद सोडावे लागेल, असे म्हटल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, आपण गेल्या काही दिवसांपासून आणि महिन्यांपासून हेच सांगत आहोत. नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल, असा दावा त्यांनी केला.

‘१७ सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल’

१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले. १७ सप्टेंबरनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावा त्यांनी केला. ‘१७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे,’ असे राऊत म्हणाले. तसेच मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अमित शाह हे पंतप्रधान होतील, अशी शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.

‘अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत’

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अमित शाह हे पंतप्रधान होतील, अशी चर्चा केली जात असली तरी अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. आपल्याकडे असलेली माहिती, राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये आणि समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आपण हे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणही पंतप्रधान म्हणून शेवटचे असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, त्यांच्या या दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे त्यांनी सार्वजनिक केलेले नाहीत.

‘चोरांनी चोराला सोडलं…’

अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीनचिट मिळाल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चोरांनी चोरायला सोडायचं हे चाललं आहे,’ अशी टीका त्यांनी केली. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्याविरोधातील आंदोलन संपणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. मोरगाव येथे आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; काय म्हणाले…

Next Post

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; साखरेच्या दरात मोठी वाढ, आता प्रति किलोचा भाव काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; साखरेच्या दरात मोठी वाढ, आता प्रति किलोचा भाव काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

August 20, 2026
आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

August 20, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

शिवसेना पक्ष-चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद

August 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

१६ वर्षीय मुलीचा बालविवाह; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड, चौघांना अटक

August 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page