जळगाव | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर येथे दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे (जागेवर निवड) आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात युवा शक्ति फाउंडेशन व क्वेस क्रॉप प्रा. लि., पुणे असे नामांकित उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सर्व आयटीआय, १० वी, १२ वी, ग्रॅज्युएट इत्यादी पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग इन करून अॅप्लाय करावे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी हजर राहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या. ०६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंड जवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष भेटीद्वारे किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.















Discussion about this post