Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुकान बंद करून घरी जाताना व्यापाऱ्याला लुटले; मिरचीपूड डोळ्यात फेकून लाखोंची रोकड लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । भुसावळ शहरात लुटमारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या धान्य व्यापाऱ्याला तिघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून लुटल्याची माहिती आहे. आरोपींनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्यानंतर लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्याकडील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले.

या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री टीव्ही टॉवर परिसरात घडली.
अजय प्रेमचंद कोटेचा (५०, रा. टीव्ही टॉवर परिसर, भुसावळ) हे अण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये धान्याचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता ते दुकान बंद करून त्यांचा १९ वर्षीय पुतण्या मीत कोटेचा याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते.

भूमी अभिलेख कार्यालयाजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघा व्यक्तींनी त्यांचा पाठलाग सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधार होता. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी कोटेचा यांना रस्त्यात अडवले.

डोळ्यात मिरचीपूड, दांड्याने डोक्यात वार

आरोपींनी अचानक अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला. डोक्यावर जोरदार वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. बॅगेत दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याची माहिती आहे. लूट केल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून तेथून फरार झाले.

या घटनेदरम्यान अजय कोटेचा यांचा पुतण्या मीत यालाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी कोटेचा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर न्यूरोसर्जनच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे समजते.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, याचीही माहिती घेतली जात आहे.दरम्यान, टीव्ही टॉवर परिसरातील बंद पथदिव्यांमुळे या घटनेत आरोपींना अंधाराचा फायदा मिळाल्याची चर्चा आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्यासोबतच रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे भुसावळ शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लुटीतील आरोपींना तातडीने अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

Next Post

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

August 18, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावात आजचे सोने-चांदीचे भाव किती?

August 18, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे १० निर्णय ; वाचा कोण-कोणते आहेत?

August 18, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page