सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ४७० पदे भरली जाणार असून इंजिनिअरिंग पदवी, MBA, LLB, M.Sc. तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांना ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
पदवीधर इंजिनिअर (ग्रेड A) – ३६० पदे
ऑफिसर (मार्केटिंग) (ग्रेड A) – ४१ पदे
लॉ ऑफिसर (ग्रेड A) – १० पदे
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (ग्रेड A0) – ९ पदे
डिप्लोमा इंजिनिअर (ग्रेड E0) – ५० पदे
अशाप्रकारे एकूण ४७० रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
पदवीधर इंजिनिअर पदासाठी संबंधित शाखेत ६५ टक्के गुणांसह B.E./B.Tech. आवश्यक आहे. SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांची अट आहे.
ऑफिसर (मार्केटिंग) पदासाठी MBA किंवा Business Administration/Marketing Management मधील PG Diploma आवश्यक आहे.
लॉ ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसोबत ६० टक्के गुणांसह LLB आणि संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी गुणांची अट ५५ टक्के आहे.
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदासाठी Chemistryशी संबंधित विषयात M.Sc. तसेच दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
डिप्लोमा इंजिनिअर पदासाठी ६५ टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि Industrial Safety Diploma आवश्यक आहे. SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांची अट आहे.
वयोमर्यादा किती?
वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. १ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदानुसार १८ ते २६, २८ किंवा ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात येईल.
अर्ज शुल्क किती?
General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
परीक्षा कधी होणार?
IOCL भरतीसाठी उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा म्हणजेच CBT २४ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेतील पुढील टप्प्यांची माहिती अधिकृत भरती अधिसूचनेनुसार जाहीर केली जाईल.
अर्जाची अंतिम तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. महत्त्वाचे : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी IOCLची अधिकृत जाहिरात व पदनिहाय पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेच्या अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.















Discussion about this post