Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन
बातमी शेअर करा..!

जळगाव । पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

महाज्योती, नागपूर आणि सारथी, पुणे यांच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीतील विद्यार्थी निवडीच्या निकषांमुळे अनेक पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः २०२४ मध्ये पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील ‘Provisional’ शब्द वगळून नियमित Registration Certificate देण्याची मागणी करण्यात आली.

१०० ऐवजी ५०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्या

अधिछात्रवृत्तीसाठी सध्या निश्चित करण्यात आलेली १०० विद्यार्थ्यांची मर्यादा वाढवून किमान ५०० पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. यासाठी विद्यापीठाने महाज्योती आणि सारथीकडे स्वतंत्र शिफारसपत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही करण्यात आली.

वयोमर्यादा आणि पात्रतेचे निकष शिथिल करण्याची मागणी

अधिछात्रवृत्तीच्या नवीन निकषांमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी किमान ‘B+’ ग्रेड, वयोमर्यादा तसेच NET, SET आणि PET या पात्रतांचा समावेश करण्यात आला आहे. या निकषांमुळे अनेक पात्र विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे ४५ वर्षे ठेवावी आणि NET, SET व PET या तिन्ही पात्रतांना समान संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पदव्युत्तर पदवीतील ‘B+’ ग्रेडची अट शिथिल करून पूर्वीचे नियम लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

सुविधांमधील कपात मागे घेण्याची मागणी

संशोधक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च यांसह अन्य सुविधांमध्ये करण्यात आलेली कपातही मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी भूषण लाडवंजारी, अनिल ज्ञानेश्वर हाडे, ॲड. राहुल वाकलकर, अनिल बाविस्कर, शिरीष तायडे, भूषण सोनवणे, भरत पाटील यांच्यासह पीएच.डी. संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

अर्जासाठी १३ दिवस शिल्लक

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींचा तातडीने विचार करून संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे लाडवंजारी यांनी सांगितले. तसेच राज्यातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच महाज्योती आणि सारथीच्या संबंधित कार्यालयांकडे निवेदने देऊन अधिछात्रवृत्तीचा लाभ अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

August 17, 2026
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 17, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

August 17, 2026
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page