Saturday, August 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात जामनेरातील आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या सहावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जामनेर/नाशिक । २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे आणि कार्यारंभ आदेश तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून आणखी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. याच कामांचा फायदा घेऊन काही संशयितांनी निविदा प्रक्रिया न होताच विविध कामांच्या बनावट वर्कऑर्डर तयार केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून तक्रारदाराची तब्बल ३ कोटी ५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात नाशिक पोलिसांनी यापूर्वी जामनेर येथील तनय महाजन (३२) आणि नरेंद्र महाजन (५१) यांना अटक केली होती. त्यानंतर तपास पुढे नेत शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख (३६), अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख (४३), शकील अहमद सलीमुद्दीन शेख (४२) आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफ्फार (४२) यांना वेगवेगळ्या दिवशी अटक करण्यात आली.

न्यायालयाने तनय महाजन, नरेंद्र महाजन, शोएब शेख आणि अब्दुल रईस शेख यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर शकील शेख आणि मोहम्मद गफ्फार यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

५९१ कोटींच्या कामांचे बनावट आदेश?

पोलिसांच्या तपासानुसार, संशयितांनी कुठलीही अधिकृत निविदा प्रक्रिया नसताना तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या विविध कामांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला कुंभमेळ्यातील हाऊसकीपिंग आणि इतर कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन करण्यात आला.या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजमुद्रा, डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर

तपासादरम्यान संशयितांनी बनावट यादी, भारत सरकारच्या राजमुद्रेसह कागदपत्रे, डिजिटल स्वाक्षऱ्या तसेच नाशिक महानगरपालिकेच्या टेंडर नोटीसचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तक्रारदाराला काम मिळणार असल्याचा विश्वास देण्यात आला.या फसवणुकीत वापरण्यात आलेली कागदपत्रे कोणी तयार केली, डिजिटल स्वाक्षऱ्या कशा वापरण्यात आल्या आणि आर्थिक व्यवहार नेमके कुठे व कसे झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, बनावट कागदपत्रांच्या निर्मितीमागे कोण आहे, तसेच फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा व्यवहार कुठे झाला, याचा सखोल तपास सुरू आहे. त्यामुळे कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात आगामी काळात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

किरकोळ वादाचा थरारक शेवट! मुक्ताईनगरात चाकूने हल्ला करून तरुणाची हत्या

Next Post

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात जामनेरातील आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या सहावर

August 15, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

किरकोळ वादाचा थरारक शेवट! मुक्ताईनगरात चाकूने हल्ला करून तरुणाची हत्या

August 15, 2026
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी जम्बो भरती ; १०वी-ITI उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

August 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page