जळगाव । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) समाजबांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत.
महामंडळामार्फत ५० टक्के अनुदान योजना तसेच बीज-भांडवल योजना राबविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे तातडीने सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६४४६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post