Saturday, August 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? जयंत पाटील-फडणवीस भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…
बातमी शेअर करा..!

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) एनडीए (NDA) मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच मंगळवारी रात्री माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या चर्चांना प्रचंड उधाण आले होते. या सर्व चर्चांवर आणि राजकीय भूकंपाच्या शक्यतांवर अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आणि सर्व वावड्यांचे जाहीर खंडन केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र पक्षातील कोणत्याही प्रमुख नेत्याने अशी भूमिका जाहीर केलेली नाही. या सर्व चर्चा केवळ सूत्रांच्या हवाली केल्या जात असून त्यात कोणतेही तथ्य नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, या विषयावर आपण संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि बंटी पाटील यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात एनडीएसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरही भूमिका स्पष्ट

यावेळी सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विषयावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून त्याबाबत कोणतीही शंका नाही. या संदर्भात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, खासदार असदुद्दीन ओवेसी, तसेच आपण स्वतः उपस्थित होतो. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. या बैठकीत देशभरात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांसाठी समान नियम लागू केले जातील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.

प्रस्ताव आल्यानंतर भूमिका जाहीर करणार

डिलिमिटेशनबाबतचा अधिकृत प्रस्ताव समोर आल्यानंतर पक्ष त्याचा सविस्तर अभ्यास करेल. त्यानंतर २४ तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 114 पदांची भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज

Next Post

वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जळगावातील कचरा संकलन सेवा ठप्प, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जळगावातील कचरा संकलन सेवा ठप्प, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जळगावातील कचरा संकलन सेवा ठप्प, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
.. अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे मागणी?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून १० प्रवक्त्यांची घोषणा; नव्या चेहऱ्यांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी

August 29, 2026
LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

August 29, 2026
खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

August 29, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

‘दलितांना जन्मापासून मृत्यूपर्यंत भेदभावाचा सामना’; राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर गंभीर आरोप

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page