Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

CAG अहवालानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये ; शिंदेंच्या खात्यासह ‘या’ तीन विभागांना नोटीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 14, 2026
in महाराष्ट्र
0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

मुंबई । भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या ताज्या आर्थिक अहवालाने राज्य सरकारच्या कारभारातील आर्थिक नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नगरविकास, आरोग्य आणि महिला व बालविकास या तीन मोठ्या विभागांमधील निधीच्या वापरावर कॅगने गंभीर ताशेरे ओढले आहेत. या धक्कादायक अहवालानंतर मंत्रालयात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत संबंधित विभागांकडून ३ महिन्यांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण मागवले आहे.

कॅगचा २०२४-२५ चा हा अहवाल १० जुलै २०२६ रोजी विधिमंडळात सादर करण्यात आला होता. यामध्ये काही खात्यांनी हजारो कोटींचा निधी तसाच पडून ठेवल्याचे, तर एका खात्याने बजेटपेक्षा जास्त उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे.

नगरविकास विभाग: तब्बल ११ हजार कोटी पडून!
कॅगने सर्वात गंभीर निरीक्षण नगरविकास विभागावर नोंदवले आहे. या विभागासाठी २४ हजार ६१० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे यातील तब्बल ११ हजार ५६ कोटी रुपये (जवळपास ४५ टक्के निधी) खर्चच होऊ शकला नाही. एकीकडे कर्जाचा डोंगर उभा करायचा आणि दुसरीकडे विकासाचा निधी तसाच पडून ठेवायचा, या सरकारच्या भूमिकेवर कॅगने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्य विभाग: बजेट असूनही आरोग्याची आबाळ?
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी १९ हजार ७४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यातील केवळ ३ हजार ५०० कोटी रुपयेच प्रत्यक्ष कामांवर खर्च झाले. आरोग्य यंत्रणेचे ढिसाळ नियोजन आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर कॅगने बोट ठेवले आहे.

महिला व बालविकास विभाग: बजेट संपवून ३५०० कोटींचा अतिरिक्त खर्च!
एकीकडे इतर विभाग निधी खर्च करू शकले नसताना, महिला व बालविकास विभागाने मात्र मंजूर बजेटपेक्षा जास्त हातसदुका दाखवला आहे. या विभागासाठी २९ हजार ६९३ कोटींची तरतूद असताना, प्रत्यक्षात ३३ हजार २६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. म्हणजेच मंजूर निधीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याने सरकारच्या आर्थिक शिस्तीचे वाभाडे निघाले आहेत.

कॅगचा अहवाल 10 जुलै 2026 रोजी विधानमंडळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना तीन महिन्यांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्पष्टीकरण देण्यापूर्वी प्रधान महालेखपाल कार्यालयाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, लोकलेखा समिती, विधिमंडळ सचिवालय आणि विधानभवन येथे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी आणि मराठी प्रती निश्चित संख्येत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

स्पष्टीकरण देण्यास विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. कॅगच्या या अहवालामुळे राज्यातील आर्थिक व्यवस्थापन, निधी नियोजन आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत १६ जुलै रोजी कार्यशाळा

Next Post

राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

अविवाहित मुलीच्या पोटगीबाबत मोठा निर्णय; उच्च न्यायालयाने काय सांगितले?

October 17, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा अंदाज

October 17, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page