Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या समस्येवरून राज्य विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण गेल्या वर्षभरात घटल्याचा दावा लेखी उत्तराद्वारे केला आहे. जिल्ह्यातील कुपोषणाचा टक्का आता ०.३१ टक्क्यांवर खाली आला असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

विधानपरिषदेत आमदार एकनाथ खडसे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीचा दाखला देत जळगाव जिल्ह्यातील बालकांच्या पोषणस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. जिल्ह्यातील हजारो बालके अद्यापही कमी वजनाची आणि तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. या बालकांना कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने आतापर्यंत नेमक्या कोणत्या ठोस उपाययोजना केल्या आहेत, असा रोखठोक सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता.

आमदार खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ‘पोषण ट्रॅकर’ प्रणालीद्वारे प्रत्येक बालकाच्या उंची आणि वजनाची डिजिटल पद्धतीने नियमित नोंद घेतली जाते. या अचूक माहितीच्या आधारेच बालकांच्या पोषणस्थितीचे वर्गीकरण केले जाते.

शासनाच्या नोंदीनुसार मार्च २०२५ मध्ये कुपोषणाचे प्रमाण ०.३९ टक्के होते, ते मार्च २०२६ मध्ये ०.३१ टक्क्यांवर आले, असा दावा त्यांनी केला. कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ‘टेक होम रेशन’ (THR) योजनेतून पोषक आहार दिला जात आहे. तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाड्यांमधून गरम व ताजा आहार उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय तीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी विशेष पोषणयुक्त आहार देण्यात येत असून, ‘पोषण अभियान’ अंतर्गत बालकांच्या आयुष्यातील पहिल्या एक हजार दिवसांच्या पोषणाचे महत्त्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीमही राबविण्यात येत असल्याची माहिती सरकारने विधानपरिषदेत दिली.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

July 10, 2026
जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

July 10, 2026
मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page