रावेर । अजंदा गावाजवळ बांधकाम ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व ऑनलाईन पैसे लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मजूर पुरवून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी ठेकेदाराला अजंदा रेल्वे पुलाजवळ बोलावले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत ५०० रुपये रोख हिसकावले तसेच मोबाईलद्वारे जबरदस्तीने PhonePe मधून ८ हजार रुपये विविध खात्यांमध्ये वळते केले.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यातून शेख मुस्तकीम शेख अकील (२२), शेख मोईन शेख नईम (१९) आणि फैजल बेग हिदायत बेग (१९) या तिघांना अटक करण्यात आली. यापैकी शेख मोईन याच्यावर यापूर्वीही लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.















Discussion about this post