जळगाव । इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती वाढतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, प्रत्यक्षात उलटी परिस्थिती पाहायला मिळत असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी आणि ऐतिहासिक घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात ४ हजार ६०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिका युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारीआधी सोन्याचा दर जवळपास दोन लाखांच्या आसपास पोहोचला होता. युद्धाच्या काळात जागतिक मार्केटमधील घडामोडींमुळे दरांमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले आणि दर घसरू लागले. आता हे युद्ध थांबले असूनही सोन्या-चांदीतील घसरण थांबलेली नाही. मागील काही महिन्यांच्या तुलनेत सोने आता सर्वात निचांकी पातळीवर आले आहे.
जीएसटीसह (GST) सोने आणि चांदीचे आजचे दर:
सोने (प्रति १० ग्रॅम): जीएसटीसह १,४८,९४८ रुपये
चांदी (प्रति किलो): जीएसटीसह २,३८,९६० रुपये
भारतीय सराफा बाजारात आज तेजीचा अंदाज
गेल्या काही महिन्यांच्या उच्चांकावरून सोने आता प्रचंड खाली आले आहे. आज झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार सोने खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. परिणामी, आज भारतीय सराफा बाजारात व्यवहारांची मोठी तेजी पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.















Discussion about this post