Saturday, June 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तोपर्यंत आंदोलनात माघार घेणार नाही; रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 13, 2026
in महाराष्ट्र
0
तोपर्यंत आंदोलनात माघार घेणार नाही; रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू
बातमी शेअर करा..!

मुंबई । शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनात सरकारने कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे सांगितले असले तरी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, केवळ चर्चा नव्हे तर मागण्यांवर ठोस निर्णय होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनातून माघार घेण्यास नकार दिला.

मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा

रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्या मंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. “२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाच पुन्हा ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देणे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आज अजितदादा सत्तेत असते तर असा जीआर निघालाच नसता,” असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवरही टीका करत, “त्यांना कर्जमाफीचा जीआर तरी वाचता येतो का?” असा सवाल उपस्थित केला.

सरकारला उद्या अल्टिमेटम

सरकारला आज अल्टिमेटम देणार नसल्याचे सांगत रोहित पवार यांनी उद्या अंतिम भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. “सरकारच्या कर्जमाफीतील फसवेपणा आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पुढे काही घडल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला बैल आजारी निघाला होता, त्याप्रमाणेच सरकारची कर्जमाफीही ‘आजारी’ असल्याची टीका करत त्यांनी सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आता सरकार या आंदोलनावर कोणता तोडगा काढते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यंदा जून-जुलै महिना कोरडा जाणार? महाराष्ट्रावर ‘पाणीबाणी’चे संकट; मान्सूनबाबत चिंताजनक अपडेट समोर

Next Post

नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला! एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची बंडखोरी मागे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला! एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची बंडखोरी मागे

नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला! एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची बंडखोरी मागे

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

June 13, 2026
आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा

रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे..; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात

June 13, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

पशुसंवर्धन विभागाची मोठी तत्परता; जळगावात ३५ जनावरांना सामूहिक विषबाधा, पण ‘त्या’ एका फोनमुळे टळली दुर्घटना!

June 13, 2026
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर

June 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page