जळगाव । एका भरधाव कारने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर इतर प्रवाशी जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ बुधवारी घडली. याप्रकरणी कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असं की, जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील बसस्थानकाजवळ रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३७६८) या प्रवाशी रिक्षाला भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ०२ बीआर ४३९१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षात असलेले प्रवासी जखमी झाले.
जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हरीज्ञ मोहन साहू (वय-३०) रा. वाघ नगर, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.















Discussion about this post