Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 24, 2026
in महाराष्ट्र
0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 
बातमी शेअर करा..!

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि कडाक्याच्या उन्हाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. ठाणे, सोलापूर आणि कोकणातील काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने पुणे, सातारा, मुंबई आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील काही तास पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत तापमान ३४ अंशांवर स्थिर राहणार असले तरी ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शहापूर, भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, घोडबंदर रोड, कळवा आणि खारेगाव परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून असह्य उष्णतेने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना या पावसामुळे गारव्याचा अनुभव आला.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा आब्दल यांची दीड एकरावरील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. तसेच झाडाची फांदी अंगावर पडून एक महिला गंभीर जखमी झाली असून अनेक सोलर पॅनल्सचेही नुकसान झाले आहे. वीज आणि झाड पडल्याने पशुधन दगावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ऐन आंबा हंगामात झालेल्या या पावसामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. काही भागांत विजेचा लपंडावही सुरू झाला आहे.

तर सोलापूर शहरात शनिवारी रात्री अचानक पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून ४२ ते ४३ अंश तापमानाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अनेकांनी पावसात भिजण्याचाही आनंद घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Next Post

जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page