Wednesday, May 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या गटातील तब्बल २२ ते २३ आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे बडे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

…तर ‘ते’ २२ आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील अनेक आमदार सध्या आपल्या राजकीय भविष्याबाबत प्रचंड साशंक आहेत. पक्षातील अंतर्गत नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे यांमुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेषतः जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत, त्यांनी आपला मोर्चा पुन्हा शरद पवारांकडे वळवला आहे. यातील बहुतांश आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि ते आमदार कोणते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावर अजित पवार गटानेही अद्याप मौन बाळगले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार (विलीनीकरण होणार) अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज शरद पवार गटाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “आता दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा विषय पूर्णपणे संपलेला आहे. आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे लढणार आहे.”

बैठकीतील निर्णयांबद्दल माहिती देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करून मोठ्या उमेदीने पुढे जाण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आम्ही जनतेचे वेगवेगळे प्रश्न आणि मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. तसेच, महाविकास आघाडी (मविआ) म्हणून येत्या १५ ऑगस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर दौरे करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

२२ आमदारांच्या प्रश्नावर शशिकांत शिंदेंचे सूचक वक्तव्य

आजच्या बैठकीनंतर जेव्हा प्रसारमाध्यमांनी शशिकांत शिंदे यांना अजित पवार गटाच्या २२ आमदारांच्या संभाव्य बंडाबाबत आणि शरद पवारांच्या संपर्कात असण्याबाबत थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी यावर अत्यंत सूचक वक्तव्य केले. आमदारांच्या नाराजीमुळे अजित पवार गटाला खिंडार पडणार की ही केवळ राजकीय चर्चा ठरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात संपन्न

Next Post

NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन

NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन

NEET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन

May 20, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

May 20, 2026
सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात संपन्न

सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात संपन्न

May 20, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

Breaking : तडजोड ३ लाखांची, पहिल्या हप्त्याचे दीड लाख घेताना बडा अधिकारी जळगाव ‘एसीबी’च्या जाळ्यात!

May 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page