मुंबई । राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून बदल्यांचा धडाका लावला असून, मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राज्यातील ६ वरिष्ठ सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदल्या झाल्या होत्या, त्यानंतर आता हा दुसरा मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. या बदल्यांच्या यादीत डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश असून, त्यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
कुणाची कुठे नियुक्ती झाली?
संजय खंदारे – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालयातील मुंबई विभागातील सचिव, अन्न व औषध प्रशासन विषयाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय. धीरज कुमार यांच्याकडून हा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती श्रीधर डुबे यांच्या जागी झाली.
कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.
बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीधर डुबे यांची मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आर एस चव्हाण यांची हापकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.















Discussion about this post