Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

२ हत्तींच्या धुमश्चक्रीत महिला पर्यटक चिरडली; नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेने सोडले प्राण, घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in क्राईम, राष्ट्रीय
0
२ हत्तींच्या धुमश्चक्रीत महिला पर्यटक चिरडली; नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेने सोडले प्राण, घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर
बातमी शेअर करा..!

कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘दुबारे एलिफंट कॅम्प’ मध्ये एक अत्यंत भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. कावेरी नदीच्या पात्रात हत्तींच्या आंघोळीचा आनंद घेत असताना अचानक दोन हत्तींमध्ये झालेल्या जीवघेण्या झुंजीत चेन्नई येथील एक ३३ वर्षीय महिला पर्यटक खाली पडून चिरडली गेली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे पर्यटन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

२ हत्तींच्या झुंजीमध्ये चेन्नई येथून आलेली ३३ वर्षीय महिला पर्यटक खाली पडली. हत्ती अंगावर पडल्यानंतर महिला त्याखाली चिरडली गेली. यावेळी या महिलेच्या नवऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. हत्तीच्या पायाखाली चिरडून महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिनू असं मृत महिलेचे नाव असून ती तामिळनाडूच्या चेन्नई येथे राहत होती.

Tragedy at Karnataka’s Dubare Elephant Camp.

A 33-year-old tourist lost her life after a makeshift structure collapsed during an elephant bathing session following a clash between two elephants. pic.twitter.com/zeXw0Bnx1t

— TIMES NOW (@TimesNow) May 18, 2026

या घटनेनंतर प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. या घटनेमुळे दुबारे हत्ती कॅम्पमधील पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुबारे हत्ती कॅम्प हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी हत्तींना जवळून पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येत असतात.

दुबारे एलिफंट कॅम्प हे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातल्या कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून याठिकाणी हत्ती प्रशिक्षण केंद्र देखील आहे. हे कॅम्प त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, निसर्गरम्य वातावरण आणि हत्तींसोबतच्या अनोख्या अनुभवांसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे प्रशिक्षित हत्तींची काळजी वन विभागाच्या देखरेखीखाली घेतली जाते. या कॅम्पला अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ते याठिकाणी हत्तींना आंघोळ घालण्याचा, त्यांना खाऊ घालण्याचा आणि त्यांच्या वर्तनाचे जवळून निरीक्षण करण्याचा अनुभव घेतात. याच कॅम्पमध्ये महिला पर्यटकाचा मृत्यू झाल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

औषध विक्रेता संपाच्या पार्श्वभूमीवर जळगावात नियंत्रण कक्ष सुरू

Next Post

महाराष्ट्र्रात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा’; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने जनतेची धडकी भरली!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र्रात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा’; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने जनतेची धडकी भरली!

महाराष्ट्र्रात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा'; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने जनतेची धडकी भरली!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026
हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

July 8, 2026
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page