पेपरफुटीच्या वादळामुळे रद्द करण्यात आलेली ‘नीट’ (NEET UG 2026) परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा आता रविवार, २१ जून २०२६ रोजी देशभरात पुन्हा घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) भारत सरकारच्या मान्यतेने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा पार पडली होती; मात्र पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देशभरात सीबीआयकडून (CBI) धडक कारवाई करण्यात आली होती. यामध्ये नाशिक, पुणे, हरियाणा आणि दिल्लीसह देशभरातील पेपरफुटीचे मोठे जाळे उघडकीस आले होते. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तपासानंतर, सरकारने आता नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे आता ही फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, परीक्षार्थी आणि पालकांनी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि माध्यमांवरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा शंकांसाठी उमेदवार neet-ug@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात.
पेपर फूट प्रकरणात लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक
तत्पूर्वी, नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातील विविध भागात कारवाई सुरू आहे. राजस्थानसहित महाराष्ट्रातील विविध भागात कारवाई सुरू आहे. राज्यातील लातूरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नीट पेपर फुट प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयने मोठा तपास सुरू केला आहे. पहाटेपासून आज पुन्हा एका खासगी क्लास चालकाची त्याच्या राहत्या घरून कसून चौकशी सुरू आहे. पी. व्ही कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. लातूरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या घरात सीबीआय तळ ठोकून आहे. सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून चौकशी करत आहे.















Discussion about this post