Wednesday, May 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2026
in नोकरी, राष्ट्रीय
0
NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार
बातमी शेअर करा..!

देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG २०२६ ही परीक्षा अखेर पेपर लीक झाल्याच्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) रद्द केली आहे. ३ मे रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे परीक्षा दिलेल्या सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. ‘NTA’ ने दिलेल्या माहितीनुसार, रद्द झालेली परीक्षा आता नव्याने घेतली जाणार असून पुढील ७ ते १० दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.

पेपर फुटल्याच्या आरोपांनंतर अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. अखेर संबंधित यंत्रणांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता नव्या परीक्षेसाठी आधीच्या नोंदणीचाच वापर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पेपर लीक प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांत छापेमारी आणि अटकसत्र सुरू आहे. राजस्थानमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका सुरू केली आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र नव्या परीक्षेच्या तारखेबाबत चिंता कायम आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यासाचे नियोजन सुरू केले असून, लवकरात लवकर स्पष्ट निर्णय जाहीर करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शालेय वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी अनिवार्य ; ३१ मे पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

May 13, 2026
राज्य सरकार अ‍ॅक्शन ; महाराष्ट्रातील स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू होणार

शालेय वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी अनिवार्य ; ३१ मे पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

May 13, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर हल्ल्यांचे सत्र! धुळ्यात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या गाडीवर हल्ला

May 13, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे भाकीत

May 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page