महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर उद्या येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर होणार असून, दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान राज्यभरात दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निकालाची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिका पाहता येईल.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
sscresult.mkcl.org
mahahsscboard.in
असा पाहा निकाल
सर्वप्रथम mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर सीट नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
View Result’ या पर्यायावर क्लिक करा.
स्क्रीनवर निकाल दिसल्यानंतर गुणपत्रिका डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवा.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post