गेल्या काही दिवसांपासून जगभरात विमान अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अशीच एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे या मोठ्या शहरात घडली आहे. येथे एक छोटे विमान अचानक एका निवासी इमारतीवर जाऊन धडकले. या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धूर, आग आणि किंचाळ्यांमुळे एकच खळबळ झाली.
‘एएफपी’ (AFP) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिनास जेराइस राज्याच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, सोमवारी झालेल्या या अपघातात विमानाचा पायलट आणि सह-पायलट यांचा जागीच मृत्यू झाला. विमानात एकूण पाच व्यक्ती सवार होत्या, ज्यापैकी गंभीर जखमी झालेल्या इतर तीन जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, स्थानिक हॉस्पिटल फाऊंडेशनच्या माहितीनुसार, गंभीर जखमींपैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोन जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Enter a X URL
URGENTE‼️
Avião de pequeno porte cai na região Nordeste de Belo Horizonte. O flagrante exclusivo da equipe do Globocop mostra o momento em que o avião atinge um prédio. pic.twitter.com/0J2ylj1eaR— Lucas Franco (@LucasFranco_l) May 4, 2026
अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद!
‘टीव्ही ग्लोबो’ या चॅनेलच्या हेलिकॉप्टरने या घटनेचा थरारक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये विमान हळूहळू खाली येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. समोर येत असलेल्या उंच इमारती टाळण्यासाठी वैमानिकाने शेवटच्या क्षणी विमान डावीकडे वळवले; परंतु नियंत्रण सुटल्याने विमान शेवटी एका तीन मजली इमारतीला धडकून पार्किंगच्या भागात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.














Discussion about this post