देशात नवीन महिन्याची सुरुवात होताच सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. दरम्यान, मे महिना सुरू व्हायला आता काही तास उरले असून 1 मे 2026 पासून अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम उद्या काय काय बदल होणार आणि त्याचा काय परिणाम होणार हे जाणून घेऊयात.
LPG Cylinder होणार महाग?
आखातातील युद्धामुळे घरगुती एलपीजी सिलेंडर 60 रुपयांनी महागले. तर सध्या युद्धाला ब्रेक लागला असला तरी गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होर्मुज समुद्रधनीतील दबाव तंत्र संपलेले नाही. त्याचा परिणाम दिसून शकतो. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसू शकतो.
तर बँकेतील व्यवहाराला ब्रेक
बँकांनी ग्राहकांसाठी e-KYC अपडेट करणे गरजेचे केले आहे. त्यासाठी अंतिम मुदत 1 मे आहे. ज्यांची केवायसी झालेली नाही. अथवा ज्यांनी ती अर्धवट केली आहे. त्यांना बँकिंग व्यवहार करताना आता अडचण येईल. त्यामुळे आज ही बँकिंग ईकेवायसी पूर्ण करून घ्या नाही तर व्यवहार करता येणार नाही. ग्राहकांना बँक शाखा, नेट बँकिंग अथवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून ईकेवायसी पूर्ण करता येईल. तर एसबीआय कार्डच्या विलंब शुल्काबाबत बदल करणार आहे. कमी रक्कमेवरही चार्ज द्यावा लागू शकतो.
UPI-ATM च्या माध्यमातून काढा पीएफ
पीएफ पैसे काढण्याविषयी या मे महिन्यात मोठा बदल अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना महत्त्वाचा बदल करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना पीएफचा पैसा हा युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काढता येऊ शकतो. अजून सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.
ऑनलाईन गेमिंगसाठी नवीन नियम
या 1 मेपासून ऑनलाईन गेमिंगवर नवीन नियम लागू होतील. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग ऑथेरिटी ऑफ इंडियासाठीच्या नियमांना मंजूरी दिली आहे. ऑनलाईन गेमिंग रेग्युलेशन ॲक्ट-2025 अंतर्गत गेमिंग कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. गेमिंग सर्टिफिकेशनची व्हॅलिडीटी 5 वर्षांनी वाढवून 10 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.















Discussion about this post