बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) आनंदाची बातमी दिली आहे. बँकेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
बँक ऑफ बडोदामध्ये क्रिकेट,कबड्डी, टेबल टेनिस या खेळांमध्ये स्पोर्ट्सपर्सन पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी bankofbaroda.bank.in वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. स्पोर्ट्सकोटाअंतर्गत भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये भरती करण्याची सुरुवाती २२ एप्रिलपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२६ आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. कामाचा कोणताही अनुभव नसेल तरी चालणार आहे. याचसोबत राज्य, केंद्र शासित, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात मेडल जिंकलेले असावे. किंव खेलो युथ इंडियामध्ये मेडल मिळवलेले असावे.
या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, स्क्रिनिंग, फील्ड ट्रायल बेस्डवर आधारित होणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४०५० ते ६४४८० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post