नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून Central Railway ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून खडगपूर आणि आसनसोलसाठी दोन विशेष ‘वन-वे’ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांना नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आल्याने नाशिक व जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०७ मुंबई ते खडगपूर ही विशेष गाडी शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:२० वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७:१० वाजता खडगपूर येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, रुरकेला, चक्रधरपूर आणि टाटानगर येथे थांबे देण्यात आले आहेत.या विशेष गाडीत २ वातानुकूलित (एसी), एसी-३, १२ शयनयान आणि ६ सर्वसाधारण डबे असणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच, गाडी क्रमांक ०११०९ मुंबई ते आसनसोल ही दुसरी विशेष गाडी शनिवारी २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता मुंबईहून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४:४० वाजता आसनसोल येथे पोहोचेल. या गाडीला इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, गया, धनबाद आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.















Discussion about this post