सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसीमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एलआयसीच्या फायनान्स हाउस लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
एलआयसीच्या या नोकरीसाठी तुम्ही lichousing.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३० एप्रिलपासून अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही १५ मेपर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी तुम्ही ibpsreg.ibps.in/licjamar26/ वर जाऊन अर्ज करु शकतात.
यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती, फोटो, सही अपलोड करायची आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे. यानंतर प्रिंट आउट काढून ठेवायची आहे.















Discussion about this post