जळगाव । अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे समृद्धीचे लक्षण मानले जाते, परंतु यंदा सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात प्रति १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे, तर चांदीनेही प्रति किलो ७,००० रुपयांची झेप घेतली आहे.आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५७ हजार ३८४ रुपयांवर पोहचले आहेत. विना जीएसटी सोन्याचे दर १ लाख ५२ हजार ८०० रुपये इतके आहे. तर आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ११००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह १५ लाख ७३ हजार ८४० रुपये खर्च करावे लागतील.
तर आज जळगावच्या सराफा बाजात चांदीच्या दराने देखील नवा उच्चांक गाठला आहे. १ तोळा चांदीच्या दरामध्ये तब्बल ७ हजारांनी वाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीचे दर २ लाख ६७ हजार ८०० रुपयांवर गेले आहेत. तर विना जीएसटीसह चांदीचे दर २ लाख ६० हजार रुपये इतके आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. पण उद्या अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होईल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.















Discussion about this post