नाशिक । नाशिक शहरातील सिडको परिसरात गुन्हेगारीचा एक भीषण प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर ६ ते ७ जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुयश पाटील हे सोमवारी रात्री उशिरा सिडकोतील दत्त चौक परिसरात होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी पाटील यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर एवढ्यावरच न थांबता त्यांच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या विभागप्रमुखावर कोयत्याने प्राणघातक हल्ला#nashikviralvideo #nashik #shivsena #shindesena #crime #Nashikcrime #LatestNews pic.twitter.com/hnngNIBaX4
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) April 15, 2026
जुन्या वादातून हल्ला?
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते, असे घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून येते. या थरारक घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये तीन हल्लेखोर स्पष्टपणे कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे अंबड पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली असून त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.















Discussion about this post