केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. परीक्षा संपून महिना उलटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, अशातच CBSE बोर्डाच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी परीक्षा दोन टर्ममध्ये झाल्यामुळे निकाल वेगवेगळ्या तारखांना लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या वेबसाइटवर पाहता येणार निकाल
विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात –
cbse.nic.in
results.cbse.nic.in
cbseresults.nic.in
तसेच DigiLocker आणि UMANG अॅपवरही निकाल उपलब्ध होणार आहे.
असा पाहा निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन Class X किंवा Class XII Results लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर रोल नंबर, स्कूल नंबर, जन्मतारीख आणि अॅडमिट कार्ड क्रमांक टाकावा. यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल. विद्यार्थ्यांना मार्कशीट डाउनलोड करून प्रिंट घेता येईल.
दरम्यान, निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post