Monday, March 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

यावेळी जि.प. सेस २०२५-२६ अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमधील ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी सुमारे ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात व दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत करणे हा आहे.

बैठकीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) च्या कार्यप्रणालीचा तसेच उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. याशिवाय यूडीआयडी (UDID) कार्ड वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित अर्ज व त्याच्या गतीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यूडीआयडी प्रमाणपत्र पडताळणीची स्थितीही तपासण्यात आली.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीच्या खर्चाचा आढावा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ टक्के निधी व विविध विकासकामांची माहिती बैठकीत देण्यात आली. मर्यादित व कायदेशीर पालकत्व प्रकरणे, शासकीय इमारतींमध्ये सुगम्यता (Accessibility) सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी समावेशक व सशक्त समाज निर्मितीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी  बैठकीत दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

Next Post

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

March 30, 2026
Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

Jalgaon : दिव्यांग कल्याण योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण

March 30, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

March 30, 2026
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा

२६ महिन्यांनंतर सेन्सेक्स ७२,००० च्या खाली; गुंतवणूकदारांना ९.४३ लाख कोटींचे नुकसान

March 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page