भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे, भारतीय नौसेनेत मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. इच्छुक उमेदवार www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला असावा. या नोकरीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान त्यांना १४,६०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. यानंतर लेवल ३ नुसार डिफेन्स पे मॅट्रिकनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी स्ट्रीममध्ये पास असणे गरजेचे आहे.या नोकरीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.
सिलेक्शन प्रोसेस
या नोकरीसाठी सर्वात आधी इंडियन नेव्ही एंट्रस टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी १ तासाचा वेळ दिला जाईल. यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमची पुन्हा परीक्षा होणार आहे. यामध्ये इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.
यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.
याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.














Discussion about this post