मुंबई । सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद आता थेट विधानपरिषदेत उमटले आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली.
निवडीदरम्यान झालेल्या राड्यात मंत्री शंभुराज देसाई यांना दुखापत झाली होती. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, पोलीस अधीक्षकांनी पक्षपातीपणे वर्तन केल्याचा आरोप केला. काही सदस्यांना पोलिसांनी जबरदस्तीने बाहेर नेल्याचाही दावा त्यांनी केला.
विधानपरिषदेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित होताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निर्णयामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संख्याबळ नसतानाही भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post