Saturday, March 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना 24 तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील”
बातमी शेअर करा..!

रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन

जळगाव | दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे. मतदारसंघात तसेच जिल्ह्यात वीज समस्या दूर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे व इतर सुविधा मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आल्या आहेत. जळगाव – धरणगाव तालुक्यात सुमारे ₹32 कोटींच्या निधीतून उपकेंद्र, रोहित्रे व लाईन सुधारणा सुरू आहे. नंदगाव उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार असून ग्रामस्थांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. भविष्यात गरज भासल्यास येथे 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार अशी ग्वाही देत याशिवाय परिसरातील सुमारे ₹150 कोटींच्या भोकर पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देत, “सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुम्हीही विकासाच्या कामांना साथ द्या,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र कृषी धोरण 2020 योजनेअंतर्गत 4 कोटी खरच करून उभारलेल्या नंदगाव येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच ग्रामस्थांना 24 तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नंदगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹15 लाख), पिलखेडा येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता व गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹30 लाख) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नंदगाव – फेसर्डी – किनोद ग्रा.मा. 40 या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ₹60 लाखांच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता श्री. कपुरे यांनी वीज उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. तर आभार विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी मानले.

याप्रसंगी विष्णू भंगाळे, अनिल भोळे, पवन सोनवणे, शिवराज पाटील, गजानन सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, कैलास चौधरी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, उपकार्यकारी अभियंता विजय कपूरे, शाखा अभियंता पाटील दिनेश पाटील, चंद्रकिरण सोनवणे, दूध संघाचे रमेश आप्पा, दत्तू आबा सोनवणे, कमलाकर बोरसे, पाटील नवीन पाटील, कृष्णा सोनवणे, बापू धनगर, डॉ. कमलाकर पाटील, गोपाल जीभाऊ, शिवाजी सोनवणे, प्रमोद सोनवणे, योगेश लाठी, सरपंच रोहिणी साळुंखे, निलेश साळुंखे, पंकज चौधरी, योगेश पाटील, संदीप पाटील, नितीन सपकाळे, जितू पाटील, समाधान पाटील, जळगाव मनपाचे नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, अजय पाटील, शाखा अभियंता पाटील यांच्यासह नांदगाव, फेसरडी, पिलखेडा, भादली खुर्द परिसरातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे ! नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी, सोने,चंदीसह रोकड लंपास

Next Post

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता लगेचच तपासून घ्या

March 21, 2026
अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ; म्हणाल्या, “खरातला गुरु मानलं होतं, पण…

चाकणकरांचा राजीनामा ! आता महिला आयोगाचा नवीन अध्यक्ष कोण? ही दोन नावे समोर?

March 21, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची खळबजनक प्रतिक्रिया ; म्हणाले..

March 21, 2026
Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

Wait and Watch…! रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

March 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page