जळगाव । सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. अशातच ग्राहकांना दिलासा देणारी बातमीचा आहे. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीचे दर ६००० रुपयांनी घसरले आहेत.
काल जळगाव सुवर्ण नगरी मध्ये सोन्याचे दर १४८००० होते. या दरात आज चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,४४,००० झाले आहेत.तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे २३६००० वरून २३०००० इतके झाले आहेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता सुरू झालेली घसरण खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलर इंडेक्स वाढत असल्याने आणि रुपयाची नीचांकी पातळी गाठल्यामुळे सोन्याचे दर घसरत आहेत. दरम्यान आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची जर तीव्रता अशीच राहिली तर भविष्यातही सोनं-चांदीच्या दरात अधिक घसरण होण्याची शक्यता आहे















Discussion about this post