Friday, March 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

जळगाव | ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण व जनजागृती यंत्रणा सक्षम करण्यात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय असून त्या शासनाच्या योजनांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्या खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट घराघरात पोहोचतात. मातां व बालकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पडत असून कोविडसारख्या कठीण काळातही जीवाची पर्वा न करता सेवा दिल्याने समाजात त्यांच्याबद्दल आदर अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यास शासन कटिबद्ध असून त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ते पुढे म्हणाले की, गावाच्या विकासाची खरी ताकद म्हणजे या महिला कर्मचारी असून जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील दोन वर्षांत 231 अंगणवाडी इमारतींसाठी निधी देण्यात आला आहे. उर्वरित 150 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण करून जळगाव जिल्हा भविष्यात शंभर टक्के अंगणवाडी इमारती असलेला राज्यातील पहिला जिल्हा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीपीडीसी अंतर्गत 550 स्मार्ट अंगणवाड्यांना मंजुरी, 200 केंद्रांना स्वयंपाकासाठी भांडी, तसेच पंधराव्या वित्त आयोगातून 2179 केंद्रांना लहान मुलांसाठी बनाना शेप बाक सुविधा देण्यात आली आहे. 350 मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या केंद्रांमध्ये रूपांतर करून बालविकासाला चालना देण्यात आली असून मुलांना डिजिटल व आधुनिक शिक्षण देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या एक वर्षातील उल्लेखनीय कार्याचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात तीन पर्यवेक्षिका, 19 अंगणवाडी सेविका, 19 मदतनीस आणि 19 आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वावडदे येथील सुरेश पाटील या शेतकऱ्याला ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान प्रेरणादायी असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जळगाव येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.प्रास्ताविकात महिला व बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांनी पुरस्काराची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका अनिता मुगल यांनी केले तर आभार जामनेर येथील सीडीपीओ दमयंती इंगळे यांनी मानले.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितले की, बालकांची सेवा हीच खरी सेवा हाच खरा पुरस्कार असून प्रत्येकाने यापुढेही सेवाभावाने काम करण्याचे आवाहन केले. खासदार स्मिताताई वाघ यांनीही सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या या ग्रामीण प्रशासनाचा कणा असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यांची होती खास उपस्थिती
खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, अप्पर जिल्हाधिकारी हेमंत हारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे, सौ. वर्षाताई भदाणे, गटविकास अधिकारी विनोद बोढरे, मंजुश्री गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाला ; यांच्याकडे सोपवली जबाबदारी?

Next Post

एलपीजी सिलिंडरनंतर आता पेट्रोलच्या दरात इतक्या रुपयांची वाढ? वाहनधारकांना धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

एलपीजी सिलिंडरनंतर आता पेट्रोलच्या दरात इतक्या रुपयांची वाढ? वाहनधारकांना धक्का

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

एलपीजी सिलिंडरनंतर आता पेट्रोलच्या दरात इतक्या रुपयांची वाढ? वाहनधारकांना धक्का

March 20, 2026
सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

अखेर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाला ; यांच्याकडे सोपवली जबाबदारी?

March 20, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

कर्जमाफीच्या घोषणेनंतर जळगाव प्रशासन ॲक्शन मोडवर ; ‘इतक्या’ शेतकऱ्यांच्या गळ्यात ‘कर्जमुक्ती’ची माळ

March 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page