पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत “फरार” असल्याची सोशल मीडिया पोस्ट केल्याने रूपाली ठोंबरे पाटील यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार… बजाव टाळी…” असा खोचक उल्लेख करत त्यांनी ही पोस्ट केली आहे.
या पोस्टनंतर पुण्यासह राज्यभरात चर्चा रंगली असून, चाकणकर खरोखरच सार्वजनिकपणे अनुपस्थित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या माध्यमांसमोर न आल्यामुळेच ठोंबरे-पाटील यांनी हा टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वातावरण तापले आहे. खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले. यात चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत, सुषमा अंधारे आणि स्वतः ठोंबरे-पाटील यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता “फरार” पोस्टमुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे.
सध्या या पोस्टचा नेमका अर्थ काय—हा केवळ राजकीय टोला आहे की गंभीर आरोप—याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. चाकणकर यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post