मुंबई । मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्त्राईल युद्धामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला असून त्याचे परिणाम भारतातही दिसू लागले आहेत. घरगुती गॅसच्या दरवाढीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंधन बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅसच्या किंमत ११५ रुपयांनी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल कंपन्यांनी एक निर्णय घेतला आहे. आधी पैसे भरा मग पेट्रोल मिळणार, असे मेसेज डीलरला पाठवले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून तुलनेने स्थिर असलेल्या इंधन दरात आता वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 85 डॉलर्सच्या पुढे गेले असून युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post