सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (सीबीआय) ने विविध स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे बँक एकूण २७५ रिक्त पदे भरत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँकेत सध्या स्पेशलिस्ट कॅटेगरी ऑफिसर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८४८० ते १,२०,९४० रुपये पगार मिळणार आहे.
आवश्यक पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. वेब सर्वर अॅडमिनिस्ट्रेशन पदासाठी बी.ई, बीटेक, एमटीएससोबत स्केल २ पदांसाठी ४ वर्षांचा अनुभव असावा. डेटा आर्किटेक्ट आणि डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीए डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा गवर्नंस पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीएसोबत ६ वर्षांचा अनुभव असावा.















Discussion about this post