पाचोरा | शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत २६ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे येणार आहे. याबाबतची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत येथे विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपुजन देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सदस्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम नेमका कुठे होईल हे अद्याप निश्चीत झाले नसले तरी साधारणपणे एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर याचे आयोजन करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे देखील आमदार पाटील म्हणाले.















Discussion about this post