सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (MO) गट-अ (MBBS आणि विशेषज्ञ) पदांसाठी १४४० रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अधिकृत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरून अर्ज करण्याचे सुचवले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ आहे.
रिक्त जागा: १४४०
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS – ७६६
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ – ७७४
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS -: MBBS पदवी
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
अंतिम तारीख: २० मार्च २०२६
वेतनश्रेणी: S-20 (₹५६,१०० – ₹१,७७,५००)
वयाची अट :२० मार्च २०२६ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ: ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क : खुला प्रवर्ग: ₹१०००/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/महिला/खेळाडू: ₹७००/-]















Discussion about this post