भुसावळ । होळीनिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उधना मालदा टाउन दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजकोट मेहबूब नगर साप्ताहिकच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. दोन्ही गाड्यांना भुसावळ थांबा आहे.
गाडी क्रमांक ०३४१८ उधना -मालदा टाउन विशेष गाडी २ ते २३ मार्च या कालावधीत प्रत्येक सोमवारी उधना येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल. मालदा टाउन येथे बुधवारी पहाटे ५.५५ वाजता पोहोचेल. तर ०३४१७मालदा टाउन उधना गाडी २८ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान प्रत्येक शनिवारी मालदा टाउन येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल. उधना येथे सोमवारी पहाटे २.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी चलथान, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी थांबेल. ०९५७६ महेबूबनगर राजकोट (प्रति मंगळवार) ३ ते ३१ मार्चपर्यंत विस्तारित केली आहे. –















Discussion about this post