Thursday, November 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का? अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होणार; सर्व्हेने उडवली खळबळ!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 26, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का? अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होणार; सर्व्हेने उडवली खळबळ!
बातमी शेअर करा..!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या एका ओपिनियन पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज्यात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असला, तरी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यास सत्तेचे गणित पूर्णपणे बदलू शकते. या दोन्ही पक्षांच्या आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता सर्व्हेत वर्तवण्यात आली असून, अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

‘स्कोर इंटेलिजेंस’ (SCORE Intelligence) या संस्थेने 15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2026 या कालावधीत तब्बल 91 हजार 429 मतदारांचा कल जाणून घेतला. या सर्वेक्षणातून उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात अटीतटीची लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे विरोधकांची एकजूट झाली किंवा नाही, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

आघाडी न झाल्यास भाजपला फायदा?
उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 403 जागांपैकी बहुमतासाठी 202 जागांची आवश्यकता आहे. सर्व्हेनुसार भाजपला 177 ते 215 जागा मिळण्याचा अंदाज आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास समाजवादी पार्टीला 160 ते 202 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागू शकते.

याशिवाय जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलाला 10, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (सोनेलाल) ला 5, ओमप्रकाश राजभर यांच्या सुभासपाला 3 ते 5, संजय निषाद यांच्या निषाद पार्टीला 3, तर जनसत्ता दल लोकतांत्रिकला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.

या सर्वेक्षणातील सर्वात महत्त्वाचा अंदाज म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचा. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना 174 ते 219 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच या आघाडीला बहुमताचा 202 जागांचा आकडा गाठण्याची संधी आहे.दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 181 ते 226 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सध्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून चर्चा आणि तणाव असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र येतात की स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विरोधकांची आघाडी प्रत्यक्षात उतरल्यास भाजपसमोर सत्तेचे आव्हान निर्माण होऊ शकते. मात्र, हे सर्व अंदाज ओपिनियन पोलवर आधारित असून प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात रब्बी हंगामासाठी आणलेले साहित्य चोरट्यांनी पळवले; शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का? अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होणार; सर्व्हेने उडवली खळबळ!

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का? अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होणार; सर्व्हेने उडवली खळबळ!

November 26, 2026
जळगावात रब्बी हंगामासाठी आणलेले साहित्य चोरट्यांनी पळवले; शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

जळगावात रब्बी हंगामासाठी आणलेले साहित्य चोरट्यांनी पळवले; शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

November 26, 2026
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्काचे ५० टक्के पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

November 26, 2026
नर्मदा-तापी वळण योजनेला ५,५४८ कोटींची मंजुरी; नंदुरबारच्या ७५ गावांना मोठा फायदा

नर्मदा-तापी वळण योजनेला ५,५४८ कोटींची मंजुरी; नंदुरबारच्या ७५ गावांना मोठा फायदा

November 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page