Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 23, 2026
in महाराष्ट्र
0
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. वर्षातील सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे हे अधिवेशन राज्याच्या आर्थिक आणि धोरणात्मक दिशेला आकार देणारे ठरणार आहे. पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलेल्या भाषणात अनेक विषयांवर भाष्य केले. आपल्या अभिभाषणात त्यांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा सादर करताना उद्योग, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांचा उल्लेख केला.

‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करताना ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा निर्धार राज्यपालांनी व्यक्त केला. गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे संकेत दिले.

यावेळी त्यांनी विशेषतः दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, दावोस करारातून राज्यात ३० लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे परदेशी थेट गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र देशात पुन्हा एकदा अग्रेसर ठरला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पीक नियोजनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे धोरण सरकारने आखले आहे, असे राज्यपाल म्हणाले.

दरम्यान येत्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठी राज्याचे नवीन उद्योग आणि सेवा धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणामुळे सेवा क्षेत्रात आणि उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.

अधिवेशनात गाजणार कोणते मुद्दे?

अर्थसंकल्प, शेतकरी प्रश्न, पायाभूत सुविधा प्रकल्प, तसेच विविध कल्याणकारी योजनांवरील चर्चा या अधिवेशनात रंगण्याची शक्यता आहे. विरोधकांकडूनही सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जात असल्याने सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विकासाचा अजेंडा स्पष्ट करत आगामी धोरणांची दिशा ठरवली असून पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

Next Post

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

February 23, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळमार्गे होळीनिमित्त उधना-मालदा टाउन एक्स्प्रेस धावणार ; तपासून घ्या वेळापत्रक

February 23, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page