जळगाव/मुंबई । फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यातही जळगाव जिल्ह्यासह राज्यात थंडीचा प्रभाव फारसा जाणवला नाही. उलट हिवाळ्याने लवकरच माघार घेतल्याचे चित्र दिसत असून, 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे वातावरण राहणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकण ते विदर्भपर्यंत तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नववर्षापासूनच थंडीचा प्रभाव कमी होत गेला असून 21 फेब्रुवारीला बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढेल आणि वातावरण बहुतेक ठिकाणी कोरडे राहील. काही भागात कमाल तापमान सुमारे 1 अंश सेल्सिअस वाढू शकते.
हा अंदाज फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून, पुढील काही दिवसांतही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीपर्यंत उष्णतेत टप्प्याटप्प्याने वाढ होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि बाहेर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरत आहे.















Discussion about this post