मुंबई | महाराष्ट्रात इयत्ता बारावीच्या परीक्षा दरम्यान सामूहिक कॉपीसंबंधी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांनी सांगितले की, ३४ कर्मचारी निलंबित करण्यात आले असून २७ कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत १०९ कॉपीप्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी पुण्यात २७, नागपूरमध्ये ११, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६, अमरावतीमध्ये ५०, नाशिकमध्ये ४ आणि लातूरमध्ये ११ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडा येथे भौतिकशास्त्राच्या पेपरदरम्यान सामूहिक कॉपी करताना प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणी २६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका, पाडळसिंगी येथे विद्यार्थ्यांकडून कॉपी करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दगडाला बांधून कॉफी वर्गात टाकल्याचे दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचे स्पष्ट केले.
राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमांचा वापर केला जात आहे. ३३ हजार शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांना ई-मेल, एसएमएस व व्हाट्सअपद्वारे मार्गदर्शन देण्यात आले आहे. संवेदनशील १९१ परीक्षा केंद्रांवर सोशल मीडिया व्हिडिओद्वारे संदेश पोहचविण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील ५५४ केंद्रांवर अजूनही सीसीटीव्ही नाहीत.














Discussion about this post