एकीकडे कोरोनातून जग आता कुठे सावरू लागलं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हेरियंटला एरिस या नावाच्या व्हायरसने विळखा घातला असून या नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
ब्रिटनमध्ये पसरलेल्या या व्हेरियंटला EG.5.1 म्हणून संबोधलं जातं आहे. त्यालाच EG.5.1 Eris असं टोपणनाव देण्यात आले आहे. इंग्लंडमधील आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचं म्युटेशन असल्याचं सांगितलं आहे.
याची लक्षणे खूप सामान्य आहेत. सध्या या व्हेरियंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. UKHSA च्या अहवालानुसार, सध्या ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 1.97 टक्के इतकं आहे. देशातील प्रत्येक सात कोरोना संक्रमितांपैकी एका रुग्णाला नवीन एरिस व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, या नवीन व्हेरियंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नवीन कोविड लाट येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post