मुंबई । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मुंबईत आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादावर आपले प्ररखड मत व्यक्त केले होते. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक्सवरून पोस्ट लिहित आक्षेप घेत टीका केली होती.
त्यानंतर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे संघाच्या कार्यक्रमात आलेले ते मोदींना घाबरून नाही आले. तर राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले असल्याची जहरी टीका केली होती. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देत कोश्यारी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
नेमकं काय म्हणाले होते कोश्यारी?
“मी राज ठाकरे यांचा आदर करतो. मला असं वाटतं आहे की, राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत. त्यांनी घाबरलं नाही पाहिजे. त्यांनी मोंदीजींच्या जवळ गेलं पाहिजे. मोदींजींसाठी सर्व जनता समान आहे. ज्याप्रमाणे रामाला त्यांची सर्व प्रजा समान होती, त्याप्रमाणे मोदींजींना देखील सगळे समान आहेत,” असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी आक्रमक शब्दांत जोरदार प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारी यांचा एकेरी उल्लेख करत “त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय,” अशा शब्दांत सुनावले. संजय राऊत पुढे असेही म्हणाले की, “तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे.” अशा शब्दांत जोरदार घणाघात संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केला.















Discussion about this post