मुंबई । एकीकडे चेक बाऊंन्स प्रकरणामुळे बॅालीवूड अभिनेता राजपाल यादवने तिहार तुरुंगात आत्मसर्मपण केले आहे. अशातच आता मराठी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह आणखी ११ जणांवर असे एकूण मिळून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त एनआयएने दिले आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या आहेत. १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयरमध्ये एका व्यक्तीने या सर्वांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सिनेस्टार आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला असल्याचे म्हटले आहे.
नेमका आरोप काय आहे?
अभिनेत्याने त्याच्या साथीदारांसह शहरातील मिश्राना परिसरातील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या नावाखाली गावकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली, असा आरोप करण्यात आला आहे. १२ व्यक्तींमध्ये समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, फंड मॅनेजर संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याअगोदरही विविध प्रकरणामुळे चर्चेत
या प्रकरणापूर्वी २०२५ मध्येही अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव एका फसवणुकीच्या प्रकरणात समोर आले होते. अजूनही काही प्रकरणात त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. २०२५ मध्येच श्रेयस तळपदेचे नाव एका चिटफंड प्रकरणातही समोर आले होते आणि त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा येथे तक्रार दाखल झाली होती. आता या नवीन प्रकरणामुळे त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.















Discussion about this post