पुणे । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला, घसा खवखवणे, ताप आणि श्वास घेण्यात काही अडचण येत होती.
आज सकाळपासून त्रास वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानावरून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह त्यांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांची तपासणी सुरू आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीनंतर त्यांना ऍडमिट करण्याचा की उपचार करून घरी पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल.शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत.
गेल्या काही दिवसांत दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार बारामती, मुंबई आणि पुणे येथे दौरे करत होते. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत असल्याने थकवा आणि आजारपण वाढले असावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. लवकरच अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाईल.















Discussion about this post